भोंदू अशोक खरातप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Sonalee Kulkarni  लैंगिक छळाचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी करत आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी आठ प्रकरणं लैंगिक छळ आणि शोषणाशी संबंधित आहेत, तर दोन फसवणुकीची आहेत. एसआयटीला आतापर्यंत खरातविरोधात फोनद्वारे 100 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे.
 

Sonalee Kulkarni 

सोनाली कुलकर्णीची पोस्ट काय आहे?
अभिनेत्रीणे संवाद साधत Sonalee Kulkarni  पोस्ट उपलोड केली आहे. त्यात त्या म्हणाल्या आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक गैरवर्तन, आर्थिक फसवणूक, भावनिक शोष, दांभिकत, किती मोठी पिळवणूक मोठा प्रमाणात होते. अजूनही आपण म्हणणार ‘आमच्याच धर्मातील अंधश्रद्धा का दिसते?’ आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण आपणच स्वच्छ करायला नको का? या घटना महाराष्ट्रात, आपल्या आजूबाजूला घडत आहे. आपण ठगले जात आहो. कधी पर्यंत या घटना चालतील असेही त्या म्हणाल्या