क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू : कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर

*जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
megha-bahekar : उन्हाळी सुटीचा सदुपयोग करून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित ’ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर’ हे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास जिल्हा कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी व्यक्त केला.
 
 
K
 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित या शिबिराचा उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा संकुल, जाभरून रोड येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा स्काऊट गाईड अधिकारी कविता पवार आणि सुनील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेघा बाहेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरार्थींना खेळाचे महत्त्व पटवून दिले व व्यक्तिमत्व विकासावर भर दिला. कविता पवार यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण करणे हा मुख्य उद्देश असून, विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.