बुलढाणा,
hanuman-janmotsav : येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सावाची आज २ एप्रिल रोजी जन्मोत्सवाचे भजन महाप्रसादाने सांगता करण्यात आली. शहरातील प्रञकार भवन परिसरातील स्वंयभू मारोती संस्थानात ४१ वर्षा पासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती नमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त १ एप्रिल रोजी सुनिल जोशी यांचे शारदा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर आज २ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी ६ वाजता हनुमंतरायाचा पार पडला. सकाळी १० ते १२ लोकजागरण मंचचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी हभप गणेश केंधळे, रामदास खडसे, गंगाधर गव्हाळे, शरद काळे, सुधाकर लाजुंळकर, मधूकर जायभाये, निलेश गव्हाळे, मकरंद सराफ तसेच स्वयंभू मारोती संस्थानचे शंकर शेळके, ओंकार शेळके, राहूल शेळके, अनिल वारे, वंसता खाचणे उपस्थित होते. दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचे वाटप करण्यात येवून जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वंयभू मारोती संस्थान मिञमंडळ, बुलढाणा यांनी परिश्रम घेतले.