पुणे
tukaram mundhe आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले आहे. आईच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कर्तव्यावर असलेले तुकाराम मुंढे तातडीने पुण्याला रवाना झाले असून, रात्री ९ वाजेपर्यंत ते पोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आईचे पार्थिव आज रात्री ९ वाजता पुण्याहून बीडमधील ताडसोन्ना या गावी नेले जाणार आणि गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र शासनातील tukaram mundhe एक वरिष्ठ आणि चर्चित अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्यांवर काम करताना त्यांनी प्रामाणिकपणा आणि कार्यक्षम प्रशासनासाठी विशेष नाव कमावले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास आणि सुधारणा उपक्रम राबवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात त्यांच्या कामाची प्रशंसा केली जाते.मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या खांद्यावर महसूल, वन विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.