पावसामुळे शहरात गंभीर परिस्थिती : उपाययोजना राबवण्याचे आदेश

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
पुणे,
unseasonal rain Pune शहरात अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, अपूर्ण खोदकामे, खड्डे आणि अपुऱ्या निचऱ्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल  स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.
 


unseasonal rain Pune
 
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि अंतर्गत भागांची पाहणी करून मोठे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरू असलेली खोदकामे सुरक्षितपणे बंदिस्त करून ती पूर्वस्थितीत आणण्यावर भर दिला जात आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून पूल, अंडरपास आणि सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत. यासोबतच २४x७ नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
 
 
मध्यमकालीन उपाययोजनांमध्ये unseasonal rain Pune नालेसफाई व गटार स्वच्छता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची स्वतंत्र यादी तयार करून त्या ठिकाणी निचऱ्याचा स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाईल, ज्यामुळे कामांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने शहरासाठी एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची तयारी सुरू आहे. या आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली जाणार आहे. तसेच सखल भागांमध्ये स्वयंचलित पंपिंग प्रणाली उभारण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.
 
 
प्रशासकांनी सर्व संबंधित विभागांना unseasonal rain Pune  स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करून कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक विभागाने नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, नागरिकांकडूनही प्रशासनाच्या या उपाययोजनांचे स्वागत करण्यात येत आहे. “शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत करणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करून भविष्यात अशा परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले. प्रशासनाच्या या व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.