वर्षा लढ्ढा अमरावती मनपाच्या नव्या आयुक्त

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
अमरावती,
varsha-laddha : येथील महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती राज्य शासनाने गुरूवारी रात्री जाहीर केली आहे. विद्यमान आयुक्त सौम्या शर्मा - चांडक या ३ एप्रिलपासून प्रसूती रजेवर जाणार असल्याने उपरोक्त नियुक्ती तातडीने करण्यात आली आहे.
 
 
JLK
 
 
 
वर्षा लढ्ढा सध्या महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषद पुण्याच्या सदस्य सचिव आहेत. शुक्रवारीच त्या आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. जवळपास गेल्या १ वर्षापासून सौम्या शर्मा आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. महापालिकेच्या निवडणुका त्यांनी यशस्वीपणे पुर्णत्वास नेल्या. प्रशासन गतीमान होण्यासाठी व नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्या म्हणून त्यांनी नवनवे प्रयोग केले. त्यातल्या काहींना प्रतिसाद मिळाला. शहरातली स्वच्छता व कचरा व्यवस्थापनात त्यांनी अपेक्षेनुरूप कार्य न केल्याने कायम ओरड सुरू आहे.