नागपूर,
Vikas Nagar Sai Mandir “म्युझिक माय पॅशन” या समूहातर्फे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता विकास नगर, साई मंदिराच्या मागे, वर्धा रोड येथील विकास सभागृहात “दिल ने फिर याद किया” या शीर्षकावर आधारित सुरेल संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अजय बावडेकर, प्रकाश कुलकर्णी, जयंत वरणकर, विद्याधर बक्षी, गिरीष वझलवार, प्रदीप मार्कंडेय, दिनेश मातूरकर, अभय आगलावे, प्रशांत देवतारे, नरेंद्र माथूरकर, रोहिणी पाटणकर, वर्षा मोकासे, प्रज्ञा आगलावे, छाया लूतडे, प्रज्ञा शिरास,Vikas Nagar Sai Mandir “ गौरी बावडेकर, राजश्री शालिग्राम आणि निधी मातूरकर हे गुणी कलाकार आपली गाणी सादर करणार आहेत.कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल तांबेकर करणार असून डॉ. विजय इंगोले यांचे सहकार्य लाभणार आहे.या कार्यक्रमाचा रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दीपक तांबेकर व अनंत नाईक यांनी केले आहे.
सौजन्य :अनंत नाईक,संपर्क मित्र