वर्धा,
wardha-stormy-unseasonal-rain : बुधवारी रात्री ११.३० वाजता वातावरणात अचानक बदल होऊन वर्धा शहरासह जिल्ह्यातील आठही तालुयात कमी अधिक प्रमाणात वादळवार्यासह अवकाळी पाऊस पडला. काही भागात डेरेदार झाडं उन्मळून कोसळली. तर अनेक घरांचे अंशत: नुकसान झाले. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही भागात सुमारे १ ते २ तास तर कुठे रात्रभर कमी अधिक प्रमाणात वादळ वार्यासह अवकाळी पावसाचा जोर कायम होता. या नैसर्गिक संकटात एका जनावराचा मृत्यू झाला. प्रशासनाने वर्धा आणि आर्वी तालुयात सर्वाधिक पावसाची नोंद घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. अशातच हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बुधवारी रात्री अचानक जोरदार वार्यांसह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत एक ते दोन तास तर काही ठिकाणी रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसात शेतात ठेवलेले कुटार व इतर कृषी उत्पादने भिजली. कापणीसाठी तयार असलेल्या गव्हाच्या पिकालाही काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती आहे. देवळी, आर्वी आणि कारंजा (घा.) तालुयांत काही घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती आहे. आर्वी तालुयातील चोरांबा येथे जोरदार वार्यामुळे घरावरील टिन पत्रे उडून भिंत कोसळली. खुबगाव येथे एका जनावराचा मृत्यू झाला.
तर दुसर्या घराचे टिनचे छप्पर कोसळले. कारंजा (घाडगे) तालुयातील सुसुंद गावात दोन ते तीन घरांची टिनाची छप्परे उडाली. तसेच येथे तीन वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. देवळी तालुयातील पिंपळगाव येथे एका घरावरील टिनपत्रे वादळ वार्यासह पावसादरम्यान उडाले. दिघी येथे वादळी वार्यासह पाऊस झाला. दिघी येथे गणेश नारायण बावणे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. तर आंजी गावात अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. शिवाय एक झाडही कोसळले. मागील १२ तासांत जिल्ह्यात १३.८ मिमी पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
जोरदार वार्यामुळे आणि पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वादळ वार्यासह पावसाने विश्रांती घेतल्यावर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आली. काही ठिकाणचा विद्युत पुरवठा २ एप्रिलला दुपारी २ वाजेपर्यंत सुरळीत करण्याचे काम सुरू होते. वादळामुळे शहर व ग्रामीण भागात अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. शहरातील मुख्य बाजार परिसरातील वनमाली हॉस्पिटल मार्गावर एक जुने झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
देवळीत घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित
देवळी : तालुयात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारा पडल्या. या अवकाळी पावसामुळे काही गावांमधील घरांचे अंशत: नुकसान झाले असून अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसाचा शेतकर्यांना सुद्धा मोठा फटका बसला. आंजी (ब.) येथे घरावरील टिनाचे छत उडाले तसेच एक झाड कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपळगाव येथे वर्षा खडसे यांच्या घरावरील टिनपत्रे खाली पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले. दरम्यान, गारपीट व वादळी वार्यामुळे तालुयातील काही गावांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद झाला होता. नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी महसूल विभागाच्या चमूंसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.