मेट्रो फेज दोन अंतर्गत मार्गांवरचे काम वेगाने सुरू

-पियर उभारणीचे ६८.३०टक्के काम पूर्ण -लिफ्ट व एस्कलेटरच्या कामाचा शुभारंभ

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
work-on-metro-phase : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज दोन अंतर्गत कामठी, वर्धा, हिंगणा व भंडारा मार्गांवर मेट्रोचे निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. रिच—२ अंतर्गत ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान या मार्गिकेवर पियर उभारणीचे एकूण ४८७ पैकी म्हणजेच ६८.३०टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, १२ पैकी ११ स्थानकांवर निर्माण कार्य सुरू झाले आहे. या मार्गिकेवरील स्थानकांचे निर्माण कार्य जलद गतीने सुरू आहे. मेट्रो स्थानकाचा पायवा आणि पहिला व दुसरा मजला पर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत. या मार्गिकेवरील ४८८ पैकी १५९ म्हणजेच ३५.४९ टक्के गर्डर स्पॅन पूर्ण आहेत. तसेच, ३ पैकी २ स्टील ब्रिज व बॅलन्स कॅन्टिलिव्हरचे कार्य देखील प्रगतीपथावर आहे.
 

nagpur-METRO 
 
 
मेट्रो स्थानकात लिफ्ट - एस्कलेटरच्या कार्याचा शुभारंभ
 
 
नागपूर फेज-दोन अंतर्गत स्थानक परिसरात लिफ्ट व एस्कलेटरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मेट्रो स्थानक येथून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही कार्याची सुरुवात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते नवीन कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महा संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.
 
स्पॅनसाठी पायाभरणीच्या कामास सुरुवात
 
 
मेट्रो रेल्वे मार्गावर १०० मीटर ओपन वेब गर्डर पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या फेज-दोन प्रकल्पांतर्गत रीच १अ मध्ये भारतीय रेल्वे मार्गावर उभारण्यात १०० मीटर लांबीच्या विशेष स्पॅनसाठी पायाभरणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा १९.२५ किमी लांबीचा कॉरिडॉर खापरी मेट्रो स्थानक ते एमआयडीसी ईएसआर स्थानक दरम्यान विस्तारलेला आहे.सदर सुमारे १००० मेट्रिक टन वजनाच्या स्टील ओपन वेब गर्डर स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या स्पॅनच्या उभारणीसाठी अत्याधुनिक ट्रान्सव्हर्स लॉन्चिंग तंत्राचा अवलंब करण्यात येत या पद्धतीत गर्डरचा एक टोक पिव्होट पॉईंट म्हणून कार्य करतो, तर दुसरे टोक स्किड्स व हायड्रॉलिक जॅकच्या सहाय्याने पूर्वस्थापित ट्रॅक बीम्सवर बसविण्यात येते.