राळेगाव फाईल्स..
बजरंग दल कार्यकर्त्यांकडून जाळपोळ करून निदर्शने
आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर दगडफेक
राळेगावातून 34 मुली बेपत्ता
राळेगाव,
कथित Human Trafficking Incidents ‘मनुष्य तस्करी’च्या निषेधार्थ राळेगाव शहर सोमवार, 20 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. हिंदू समाजातील तब्बल 34 मुली बेपत्ता असल्याच्या गंभीर आरोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आणि त्याला नागरिकांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने त्याला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावला होता. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दुसरे म्हणजे तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याचे सनसनाटी प्रकरण ज्या भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी बाहेर काढले आहे, तेसुद्धा राळेगावचेच निवासी आहेत. या प्रकरणात लव्ह जिहाद आणि मानवी तस्करीचा अँगल असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राळेगाव ठाण्यावर धडक दिली होती. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
अॅड. चौहान यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना, राळेगाव परिसरातून गेल्या सहा महिन्यांत 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांच्या माता-पित्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अल्पवयीन मुली विकत घेतल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.
या मुलींचा ‘लव्ह जिहाद’साठी वापर होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आपल्या म्हणण्याला पुष्टी म्हणून त्यांनी एका ऑडिओ क्लिपचाही पुरावा दिला. तक्रारीचा ओघ अजून सुरूच असून वडकी परिसरातील उमरविहीर या गावातील एकाने आपली मुलगी एक महिन्यापासून बेपत्ता असून तिचा शोध लागत नाही. तिचा मोबाईलसुद्धा बंद असून तिच्या घातपाताची शंका त्यांनी अॅड. प्रफुल्ल चौहान यांच्याकडे व्यक्त केली.
Human Trafficking Incidents या ऑडिओ क्लिपमध्ये एका तरुण आणि तरुणीतील संवाद आहे. त्यात मजहर कुरेशी नामक इसम मुलींचा ‘व्यवहार’ करतो, असा उल्लेख आहे. त्याहून गंभीर म्हणजे या आरोपीला एका पोलिसाकडूनच वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. आता आपल्या मतदारसंघातील हे प्रकरण आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके कसे हाताळतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
हिंदू कार्यकर्त्यांकडून निदर्शने
कुख्यात गुन्हेगार मजहर कुरेशीद्वारा करण्यात येणाèया लव्ह जिहाद व मनुष्य तस्करीसंदर्भात त्याच्या साथीदारांसह कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीकरिता सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे सोमवारी संपूर्ण राळेगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. बजरंग दल कार्यकर्त्यांनी सकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ करून जोरदार निदर्शने केली. विहिंपचे राम लोखंडे, अभिजित डोंगरे, भूपेंद्र परिहार, ओम ठाकरे यांनी राळेगावला भेट देऊन संयम बाळगण्याचे आवाहन बजरंग दल कार्यकर्त्यांना केले.
संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक
मानव तस्करी या घटनेतील आरोपी मजहर कुरेशी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीच्या घरावर रविवारी सायंकाळी मोठा जमाव जमा झाला होता.काही हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपीच्या घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात घराची तोडफोड केली तसेच आरोपीची गाडी सुद्धा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
राळेगाव तालुक्यातील घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या तालुक्याला साधी भेटसुद्धा दिलेली नाही. यावरून त्यांना या तालुक्याशी काही घेणे-देणे नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणाèया मंत्र्यांचे नैतिक कर्तव्य असतानासुद्धा त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.