जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप...त्सुनामीचा इशारा

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
टोकियो,
7.4 magnitude earthquake in Japan जपानमध्ये सोमवारी भीषण भूकंपाचे धक्के जाणवले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे किनारपट्टी भागात मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर जपानमध्ये सुमारे ७.४ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला, ज्यामुळे अनेक भागांमध्ये हादरे बसले. या भूकंपानंतर तात्काळ किनारी प्रदेशांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात निर्माण झालेल्या लाटा तीन मीटरपर्यंत उंच होण्याची शक्यता असून त्या इवाते प्रांत तसेच होक्काइडोच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 

7.4 magnitude earthquake in Japan 
प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भूकंप आणि संभाव्य त्सुनामीमुळे किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.इशाऱ्यामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की समुद्राच्या लाटा किनाऱ्याकडे सरकू लागल्या असून त्या एकदाच नाही तर वारंवार धडक देऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा न करता त्वरित सुरक्षित स्थळी जावे, असा सल्ला देण्यात आला आहे.