निराधार छायाबाईंना मिळाला आधार

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मुख्यमंत्री कार्यालयाचा मदतीचा हात

नागपूर, 
कोरोनात पती पाठोपाठ मुलगा गमावलेल्या Aadhar to the destitute Chhayabai निराधार छायाबाईंना मुख्यमंत्री कार्यालयाने मदतीचा हात दिल्याने त्या सन्मानाने आपले आयुष्य जगत आहेत. सोनेगाव परिसरात राहणार्‍या छायाबाई पाटील साधारण ६५ वर्षांच्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तरुण मुलाच्या आधाराने त्यांचे सुरू होते. मात्र, कोरोनाची साथ आली. त्यांच्या मुलाला मेडिकलमध्ये दाखल करावे लागले. तरुण मुलाचाही मृत्यू झाला. राहण्याची हक्काची जागा नाही, पती व मुलगाही नाही. पुढे जगाचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता.
 
 
chya
 
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठले. विशेष अधिकारी सुनील मित्रा यांना भेटून आपबिती सांगितली. कुठलीही कागदपत्रे नाहीत. रेशन कार्ड होते, मात्र मुलगा मेडिकलमध्ये दाखल करताना ते तिथे दिले. ते मिळवून द्या, अशी तिची आर्तता ऐकून सुनील मित्रा यांनी तिला धीर दिला. सुनील मित्रा यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना पत्र लिहून रेशन कार्ड देण्याची विनंती केली. कोरोना काळात मेडिकलमध्ये मोठ्या संख्येत रुग्ण दाखल होते. त्यात मरण पावलेल्या मुलाचे रेशन कार्ड शोधणे, एक आव्हानच होते. डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे या संवेदनशिल अधिकार्‍यांनी हे आव्हान स्वीकारले.
 
 
 
Aadhar to the destitute Chhayabai या दोन्ही अधिकार्‍यांसह मेडिकल प्रशासनाने लाखो कागदपत्रांमधून रेशन कार्ड शोधून छायाबाईला परत दिले. पण, छायाबाईंच्या हाताला काम नव्हते. मुख्यमंत्री कार्यालयाने सोनेगाव परिसरातील मीनाक्षी तेलगोटे यांना काम शोधण्याची विनंती केली. त्यांना त्या परिसरातच घरकाम मिळाले. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अन्य कागदपत्रांची गरज होती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष पुढाकार घेऊन त्यांची इतर आवश्यक कागदपत्रे तयार केली. त्यांना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायला सांगितले. आता या योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये छायाबाईंना मिळत आहेत. ही रक्कम घरकामातून मिळणारे पैसे यातून त्यांची गुजराण व्यवस्थित होत आहे. ‘मुख्यमंत्री कार्यालयाने मला नुसती मदतच केली नाही, तर माझ्या मागे भक्कम आधार उभा केला. त्यामुळेच आता मला एकटं वाटत नाही’ अशी भावना छायाबाईंनी व्यक्त केली.