वन कोठडीतील ‘त्या’ तीन आरोपीची तुरुंगात रवानगी

* कासव तस्करी प्रकरण * संशयित आरोपींकडून दोन कासव जप्त

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
सावली, 
accused-sent-to-jail : कासव तस्करी प्रकरणातील वन कोठडीतील असलेल्या त्या 3 आरोपींना सोमवार, 20 एप्रिल रोजी सावली येथील न्यायालयाने चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
 
 
K
 
 
तालुक्यातील वनविभागाच्या धडक कारवाईमध्ये 12 एप्रिल रोजी कासवांच्या तस्करीत सहभागी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 2 कासव जप्त करण्यात आले होते. त्यातील 3 आरोपींना वन कोठडी व 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
 
 
सावली तालुका वनपरिक्षेत्र अंतर्गत उपवनपर क्षेत्र व्याहाड खुर्द परिसरामध्ये शेत परिसरात कासवाचे तस्करी प्रकरण करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता, वनविभागाने धडक कारवाई केली होती. हे प्रकरण वेगवेगळे वळण घेत असल्याने या तस्करीवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. मात्र, आत्तापर्यंतच्या तपासाअंती हे प्रकरण कासव तस्करीचे असल्याचेच सांगितले जात आहे. वन कोठडीत असलेले आरोपी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
 
 
या तस्करीमध्ये संशयित आरोपींची वनविभागातर्फे तपासणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात संशयित आरोपींकडून थेरगाव येथील दोन कासव वनविभागाने हस्तांतरण केले. पुढील तपास वनविभागाच्या चमूकडून सुरू आहे.