नाशिक, यवतमाळनंतर 'नागपूर फाईल्स'

धर्मांतरण करण्यासाठी 5 हिंदू तरुणींवर दबाव

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Files नाशिक आणि यवतमाळमधील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नागपूरमध्येही असाच काही धक्कादायक प्रकार समोर आली आहे. फिकर फाउंडेशनशी संबंधित असलेला रियाझ काझी याला मानकापूर पोलिसांनी मध्यरात्री तडकाफडकी अटक केली. त्याच्या एनजीओ संघटनेत काम करणाºया तरूणींनी त्याच्यावर मानसिक छळ, विनयभंग, अश्लील चाळे, बदनामी तसेच धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. आतापर्यंत ४ पीडितांनी तक्रारी दाखल केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
 
 
 Nagpur News
 
 
आरोपी गेल्या वर्षभरापासून छळ करत होता. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी दबाव आणत होता आणि नकार दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी देत होता. इतकेच नाहीतर नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबीयांना धमक्या देत होता असा आरोप पीडितांनी तक्रारीत केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून मानकापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निरीक्षक हरेष कळसेकर यांनी शनिवारी संध्याकाळी तातडीने तपास पूर्ण केला आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १३५, २०२६, ७४, ७५ (२), २९६, ३०२ (१), ३५६ (२) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून रियाझ काझीला रात्रीच अटक केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अंतर्गतही रियाझ काझीवर कारवाई करण्यात आली असून त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. रविवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावली.
  
 
तपासात पोलीस संघटनेच्या कारवाया, त्यात सामील असलेल्या व्यक्तींची भूमिका आणि संभाव्य नेटवर्कची तपासणी करत आहे. याव्यतिरिक्त, पीडितांना कोणत्याही दबावाशिवाय बोलता यावे यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, संबंधित संघटना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर शक्य तितकी कठोर कारवाई करू, असा विश्वास पोलिसांनी दर्शविला आहे.