अंबाझरी फ्लो पुलाजवळ रस्तेकाम रखडले

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ambazari Flyover गजानन महाराज मंदिरालगत अंबाझरी फ्लो पुलाकडील रस्त्याचे दुरुस्ती काम अर्धवट स्थितीत थांबले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रंगपंचमीपासून सुरू झालेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

pool 
 
 
रस्त्यावर “कार्य प्रगती पर है” असे फलक लावून मोठा भाग बंद करण्यात आला असून उर्वरित कमी जागेतूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर गर्दी आणि अडचणी वाढल्या आहेत. Ambazari Flyove हे रस्तेकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असून संबंधित विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सौजन्य: डॉ. प्रभुदास रामटेके,संपर्क मित्र