मुंबई
Vijaya Rahatkar भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्या कथित शोषणापासून ते आर्थिक गैरव्यवहारांपर्यंत गंभीर आरोप या प्रकरणात समोर येत असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असून, विविध स्तरांवर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात खरातच्या जवळच्या वर्तुळातील काही राजकीय नेत्यांवरही आरोप करण्यात आले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी (सुनेत्रा पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अटकेची मागणीही काही गटांकडून होत आहे.या प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत Vijaya Rahatkar असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पोलीस आणि एसआयटी पारदर्शक पद्धतीने तपास करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.रहाटकर यांनी रुपाली चाकणकर यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्या वेळोवेळी हजर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तपास प्रक्रियेला सहकार्य करणे ही जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय वातावरण तापले
दरम्यान, Vijaya Rahatkar या प्रकरणात चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खरात यांच्या कथित आर्थिक व्यवहारांमध्ये चाकणकर कुटुंबाचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, या सर्व आरोपांचे चाकणकर यांनी वारंवार खंडन केले असून, त्यांचा खरातशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील तपासात कोणते नवे खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.