नागपूर, रामटेक
Ashtavinayak of Vidarbha वैदर्भीय अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रामटेक येथील श्री अठराभुजा गणपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी विजय सलामे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत स्वप्निल खोडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी धनेश बघेले, कोषाध्यक्ष भूपेंद्र महाजन, सचिव विजय सलामे, सहसचिव कमलाकर महाजन यांची निवड झाली. Ashtavinayak of Vidarbha तसेच विशेष सल्लागार म्हणून हुकूमचंद बडवाईक यांची नियुक्ती करण्यात आली.याशिवाय सदस्य म्हणून रितेश चौकसे, सुमित कोठारी, रवींद्र महाजन, दिलीप मेहरकुळे, रवी मथुरे, श्याम नेरकर, अनिकेत खेडकर, मोरेश्वर धावडे आणि महेंद्र खोडे यांची निवड करण्यात आली आहे.
सौजन्य:सारंग पांडे,संपर्क मित्र