बुवा बाजी चमत्कार भाकिते विज्ञानाच्या दृष्टीने सिद्ध करणार्‍यास बक्षिस देणार : अनिस संस्थापक प्रा. श्याम मानव

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
shyam-manav : राज्यात बुवा बाजी चमत्कार हवामान पावसाचे व भाकिते माोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार भाकिते जनतेसमोर सिद्ध करणार्‍यांना ८ लाख रूपयांचे बक्षिस अनिसने जाहीर केले आहे. बुवा बाबांचे प्रस्थ वाढवण्याचे, त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
 
lk;
 
 
भोंदू अशोक खरात तसेच बुवा भोंदू बाबाना बळी पडणार्‍या महिला व पूरूष जनजागृतीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ठिकठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा येथे विश्राम गृहावर दि. २० एप्रिल रोजी दुपारी प्रा. श्याम मानव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर, जिल्हा संघटक प्रमोद टाले, सुनिल जवंजाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
प्रा. श्याम मानव यांनी सांगितले, सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री बागेश्वर यांच्या सारखे मोठे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे व खरात यांच्यावर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले पण धीरेंद्र शास्त्री बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यभर भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वृक्ष तिथे छाया बुवा तिथे बाया जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.
 
 
सध्याची स्थिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य यावर त्यांनी भूमिका मांडली पुढे बोलताना प्रा. श्याम मानव म्हणाले, काँग्रेसच्या काळात बुवा बाबांवर एफ आय आर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करणे सहज शय आहे. गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले मात्र सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले.
 
 
काँग्रेसच्या काळात गुलाब बाबाचे भक्त शंकराव चव्हाण आणि सत्यसाईबाबा भक्त विलासराव देशमुख सारखे मोठे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली अलीकडच्या काळात जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात सारखा बाबा उदयास आलाच नसता. या प्रकरणात अनेक लोक अडकले त्याला जबाबदार राज्य सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. खरात प्रकरणाची सुरुवात एका पत्रकारापासून झाली. ज्या पत्रकाराने आवाज उठवला त्याला फोन करून रूपाली चाकणकर यांनी दम भरला होता. आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यामध्ये आरोपी आहे असे त्यांनी सांगितले.