केळझर येथे कार पेटली

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
सेलू, 
car-catches-fire : केळझर परिसरातील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळ मागील आठ दिवसांपासून संशयास्पदरित्या उभी असलेली विना क्रमांकाची कार रविवार १९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पेटल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
 
 
FIRE
 
वर्धेकडे जाणार्‍या मार्गालगत सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळ ही कार मागील काही दिवसांपासून बेवारस अवस्थेत उभी होती. रविवारी मध्यरात्री अचानक वाहनाला आग लागल्याचे निदर्शनास आले. आगीची तीव्रता जास्त असल्याने परिसरातील झाडे-झुडपेही आगीच्या कवेत आली होती. घटनेची माहिती मिळताच सिंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक ओम कलेगुरुवार, प्रफुल्ल डफ व रवी मोरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या सिंदी रेल्वे नगर परिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.