वाशीम,
car-hits-container : समृद्धी महामार्गावर भरधाव कारने कंटेनरला मागून दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २१८+३०० येथे २० एप्रिल रोजी सकाळी ७.४० वाजता दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असलेली एमएच ४७ बीझेड २२४२ ही कार समोर असलेल्या एचआर ५५ एयू ९३५८ क्रमांकाच्या कंटेनरला मागून जोरदार धडकली. या धडकेत कारचा चुरडा झाला. अपघातात कार चालक मेघनाथ हरिजन (वय ३४) रा. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश यांच्यासह तीन सह प्रवासी गंभीर जखमी झाले. तर एक किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र अमानी येथील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेने वाशीम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर धडक दिलेला कंटेनर घटनास्थळावरुन पसार झाला. समृध्दी महामार्गावर दर दिवसाआड अपघाताची मालिका सुरूच असून, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.