भारतीय मजदूर संघाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन
नागपूर,
Central Railway Employees Union मध्य रेल्वे कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघातर्फे रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांचा - संघटनात्मक उद्देशाने दोन दिवसीय निवासी अभ्यासवर्ग झाला. या अभ्यासवर्गात नागपूर मंडळासह मुंबई मंडळ, भुसावळ मंडळ, पुणे मंडळ, सोलापूर मंडळाचे प्रतिनिधी सहभागी होते. अभ्यासवर्गात प्रामुख्याने उपस्थित होते .
Central Railway Employees Union नीता चौबे यांनी उद्घाटन सत्रात प्रशिक्षण वर्गाच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शन केले. यात भारतीय मजदूर संघाचे धोरण आणि महिलांच्या कार्याबाबत माहिती दिली. भारतीय मजदूर संघाचे रवींद्र हिंमते यांनी स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यानंतर कार्यकर्ता परिचयाबाबत सत्र घेण्यात आले. मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन यांनी संघटनेचा विस्तार व आंदोलन कसे करावे, याबाबत माहिती दिली. भारतीय मजदूर संघाचे अ. भा. केंद्रीय सदस्य व भारतीय रेल्वे मजदूर संघाचे माजी महामंत्री मंगेश देशपांडे यांनी भारतीय रेल्वे मजदूर संघाचा इतिहास, विकास, उपलब्धी व वित्तीय विकासाबाबत उद्द्बोधन केले. भारतीय विचार मंच टोली सदस्य व संघाचे समरसता गतिविधी प्रांत सदस्य अमोल पुसदकर यांनी समाजहिताकरिता पंच परिवर्तनावर मार्गदर्शन केले. आरएसएस नागपूर महानगर सहप्रचार प्रमुख अनुप केळकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मार्गदर्शन केले. अभ्यास वर्गात मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंद झगळे, महामंत्री सागर तोमर, उपाध्यक्ष हबीब खान, अनीता पटले, सूरज चौधरी, मिलिंद कुमार प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.