सायकल मॅन’ मुथूकुमार यांची छत्रपती नगरात भेट

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Cycle Man Muthukumar ‘सायकल मॅन’ म्हणून ओळख असलेले बेंगळुरू येथील मुथूकुमार यांनी आपल्या अनोख्या सायकल प्रवासादरम्यान छत्रपती नगर गार्डन ग्रुपला भेट दिली. बेंगळुरूहून काशीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांनी येथे थांबून आपल्या अनुभवांची माहिती उपस्थितांशी शेअर केली.

mithu 
 
 
साठ वर्षांचे मुथूकुमार दररोज सुमारे १२० किलोमीटर सायकल प्रवास करतात. त्यांच्या सायकलवर फक्त दोन जोड कपड्यांची बॅग, पंचर दुरुस्तीचे साहित्य आणि तिरंगा झेंडा असतो.Cycle Man Muthukumar  प्रवासादरम्यान ते रात्री रस्त्याच्या कडेला कुठेही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास सुरू करतात.देवावर प्रगाढ श्रद्धा असलेल्या मुथूकुमार यांनी काशीची पाच वेळा परिक्रमा करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल छत्रपती नगर गार्डन ग्रुपतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सौजन्य: सुरेश चव्हारे,संपर्क मित्र