नवी दिल्ली,
dengue vaccine पावसाळ्यात दरवर्षी डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता डेंग्यूवरील पहिली लस टीएके-003 अर्थात क्युडेन्गा ला अधिकृत मंजुरी दिली आहे. औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे जाहीर केले.
जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीने विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी मानली जात आहे. या लसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या व्यक्तीला पूर्वी डेंग्यू होऊन गेला आहे किंवा नाही, याची कोणतीही तपासणी न करता ही लस देता येते. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण देण्याची क्षमता क्युडेन्गा लसीमध्ये आहे. क्लिनिकल ट्रायल्समध्ये ही लस चार वर्षांहून अधिक काळ संरक्षण देऊ शकते. ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून, त्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर असणार आहे. जागतिक आरोग्य dengue vaccine संघटनेनेही ज्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे या लसीचा वापर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या लसीचे उत्पादन हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या माध्यमातून भारतातच केले जाणार आहे.