नागपूर ,
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti बॅनर्जी लेआऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव मंडळाच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात आली. विपश्यना केंद्रातून निघालेल्या या रॅलीत मानवता शाळेच्या बँड पथकाचा सहभाग होता.
यावेळी मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रंजना ढोरे यांची निवड झाली.मंडळाच्या सभासदांमध्ये सुमित्रा अवथरे, जया खोब्रागडे, रेखा नारनवरे, सरोज हुमणे, लिला लोणारे, रेखा बुरबुरे, शालिनी रामटेके, वंदना पाटील, विजय पंचभाई, शोभा पाझारे, ज्योती काटकर,Dr. Babasaheb Ambedkar Jayanti माया गुरुभेले, कल्याणी सनकाडे, अर्चना शेडे, वंदना कडवे यांचा समावेश आहे. तसेच मारोतराव कुमार, ए. के. भिवगडे, एस. एन. चव्हाण, एम. व्ही. अवथरे, पी. एस. कुमार, एस. एम. वासे, विजय डंभारे, सुधाकर आटे, भगवान कांबळे, नामदेव चोखांद्रे, डॉ. दिनेश भाले आदी मान्यवर सदस्य म्हणून सहभागी झाले.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र