वातावरणामुळे वाढला उकाडा

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
तापमान ४२.४ अंश सेल्सिअस
आज पावसाची शक्यता
 
नागपूर,
देशातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये रविवारी नागपूरचा पाचवा क्रमांक होता. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाले तरी उकाडा वाढला आहे. Hot Nagpur temperature हॉट नागपूरचे तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदविले असून विदर्भात सर्वाधिक तापमान अमरावतीचे ४३.४ अंश सेल्सिअस तर अकोला ४३.२ सेल्सिअस होते.
 

temperature 
 
बुधवारपासून तापमान वाढले असून अक्षरक्षः होरपळल्यासारखे झाले आहे. रविवारी सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. देशातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये नागपूर ५ व्या क्रमांकावर होते. उष्णतेची लाट असल्याने नागपूरकरांना उष्णतेचा त्रास सहण करावा लागत आहे. शनिवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. गत पाच दिवसापासून नागपूरसह संपूर्ण उष्णतेची लाट पसरली आहे.
 
हवामानात बदल होणार
वाढत्या उष्णतेच्या आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने हवामानात बदल होण्याचे संकेत दिले आहे. मंगळवार, २१ एप्रिलला गडचिरोली, नागपूर आणि वर्धा येथेही पावसाची शक्यता वर्तविली आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागपूरकर त्रस्त
Hot Nagpur temperature  शहर उकाड्याने त्रस्त झाले असून वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे संतापले आहे. वीज मंडळाकडे अत्याधुनिक वीज यंत्रणा असताना सातत्याने होणारी बत्ती गुल महावितरणच्या कार्याबददल शंका निर्माण करणारी आहे. दक्षिण, पूर्व व उत्तर नागपूरात गत काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. नंदनवन, वेंकटेशननगर, कॉलणी, नासुप्रच्या घरकुल योजनेतील नागरिकांकडून तक्रारी केल्यानंतर महावितरणकडून सातत्याने कानाडोळा केल्या जात आहे. उष्णतेचा त्रास सहण करावा लागत असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.