शहरातील अवैध धंदे थांबवा अन्यथा आंदोलन

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Illegal businesses शहरातील परमिट बारवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असून अवैद्य हॉटेलमध्ये बीना परवाना अवैध मद्यविक्री केल्या जात आहे. असे अवैध धंदे पोलिस प्रशासनाने थांबवावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत दिला.
 

ill 
 
मानेवाडा चौकातील एसके बारमध्ये हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास घंटानाद आंदोलन केल्या जाईल. एस के बार मध्ये झालेल्या हल्ल्यात मॅनेजर जखमी झाला असून पोलिसांसमोर हल्लेखोरावर पळाले. नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी व सह पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.