इराणमध्ये वाढला लष्करी गटाचा प्रभाव!

राजकीय समीकरण बदलले

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
तेहरान,
influence of military group in Iran इराणमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी मोठा बदल झाल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालांमधून समोर आले असून कट्टरतावादी लष्करी संघटनेचा प्रभाव प्रचंड वाढल्याचे चित्र दिसत आहे. देशातील लष्करी आणि परराष्ट्र धोरणांवर आता या संघटनेचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील निर्णयप्रक्रियेत आधी प्रभाव असलेल्या उदारमतवादी नेत्यांना हळूहळू बाजूला सारण्यात आले असून महत्त्वाच्या पदांवर लष्करी नेतृत्वाशी संबंधित व्यक्तींना स्थान मिळाले आहे. त्यामुळे सर्वोच्च स्तरावरील धोरणात्मक निर्णय आता याच गटाच्या प्रभावाखाली घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे.
 

group in Iran 
 
अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा
या बदलामुळे परराष्ट्र धोरणावरही मोठा परिणाम झाला असून आधी चर्चेसाठी अनुकूल भूमिका घेणाऱ्या काही नेत्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते. काही महत्त्वाचे निर्णय बदलण्यात आल्याने अंतर्गत मतभेद वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.देशातील सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित काही अधिकाऱ्यांनीही या गटाला पाठिंबा दिल्याने त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. लष्करी कारवायांवर नियंत्रण वाढल्याने प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर समुद्री मार्गांवरील हालचाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
काही भागांमध्ये जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने तणाव अधिकच वाढला आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या चर्चांवरही या घडामोडींचा परिणाम झाला असून संवादाची प्रक्रिया कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विश्लेषकांच्या मते, सध्याच्या सत्तासंरचनेमुळे पाश्चात्य देशांसोबत समझोता होण्याची शक्यता कमी झाली आहे.एकूणच इराणमधील या सत्तांतरामुळे देशांतर्गत धोरणांपासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत मोठे बदल घडत असून आगामी काळात या परिस्थितीचा परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.