रामनगर राम मंदिरात धर्मध्वजाची विधिवत स्थापना

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर
Installation of religious flag अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रामनगर येथील राम मंदिरात धर्मध्वजाची विधिवत स्थापना उत्साहात पार पडली. अयोध्येतील राम मंदिरावरील धर्मध्वजाच्या धातूच्या प्रतिकृतीची स्थापना अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, अधिवक्ता आनंद परचुरे, नगरसेवक योगेश पाचपोर, उद्योजक उदयभास्कर नायर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
 
678 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. त्यानंतर मंत्रघोषात धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. यावेळी शंखनाद, ‘जय श्रीराम’च्या घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यानंतर सामूहिक रामरक्षा पठण, भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालीसा तसेच ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे १०८ वेळा सामूहिक पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली.Installation of religious flag  या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त दिपक खिरवडकर, किरण देवपूजारी, अशोक आग्रे, अशोक केदार, विनोद जोशी, दत्तात्रय खरे, मदन देशपांडे, वृषाली शिलेदार, हेमांगी अभ्यंकर तसेच रा. स्व. संघ रामनगर प्रभात शाखेचे कार्यकर्ते व अनेक रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रवी वाघमारे व सचिव राजीव काळेले यांच्या मार्गदर्शनाखाली वृषाली शिलेदार, हेमांगी अभ्यंकर, आकाश सावरकर, ओंकार सोनटक्के, मनोज ध्रुव, यशवंत जानवे, मोहन पाटीदार व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र