दिग्रस भाजपा महिला आघाडीपदी जागृती मेहता

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
दिग्रस, 
Jagriti Mehta भारतीय जनता पार्टी दिग्रस महिला आघाडी शहराध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या जागृती सतीश मेहता यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यामुळे भाजपात महिला संघटनात्मक कार्याला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. जागृती मेहता येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या संचालक असून त्यांच्या अथक प्रयत्नाने व जनसंपर्काने त्यांच्या सासू लक्ष्मी मेहता नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, 27 वर्षांनंतर त्यांना भाजपाच्या पहिल्या नगरसेवक म्हणून मान मिळाला आहे.
 
 
jagriti
 
Jagriti Mehta  भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री दत्ता राहणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत व शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. येथे भाजपा महिला मोठे संघटन उभे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत जागृती मेहता यांनी व्यक्त केले. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.