भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले
तीन दिवसीय सोहळ्याची महाआरतीने सांगता
यवतमाळ,
Lord Parashuram Jayanti अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा यवतमाळच्या वतीने आयोजित तीन दिवसीय भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडला. अक्षयतृतीया आणि परशुराम जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. स्थानिक आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कुलभूषण तिवारी, ज्येष्ठ कार्यकर्ते रामजीलाल शर्मा, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पवार आणि जिल्हाध्यक्ष संजीव जोशी यांच्या हस्ते भगवान परशुरामांचे पूजन करण्यात आले.
Lord Parashuram Jayanti यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बालकलाकार आणि महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष, फेटेधारी युवती आणि बालकलाकार यांच्या मोठ्या उपस्थितीत शोभायात्रेने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. ही शोभायात्रा महिला विद्यालय परिसरातील महादेव मंदिर येथे समाप्त झाली. येथे भगवान परशुरामांची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करून तीन दिवसीय सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, युवा ब्राह्मण संघ, सखी ब्राह्मण महिला आघाडी, समर्थ ब्राह्मण मंडळ, राजस्थानी ब्राह्मण समाज तसेच उत्तर भारतीय ब्राह्मण मंडळ यांच्या पदाधिकाèयांनी विशेष परिशम घेतले. कार्यक्रमात विविध ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.