वर्धा,
lord-parashurama-jayanti : स्थानिक टिळक चौक गोलबाजार येथील श्रीराम मंदिरात रविवार १९ रोजी परशुराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्रीराम मंदिरचे सचिव विजय धाबे, वर्धा नागरी बँकेच्या संचालक अनघा आगवण, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक मंदार अभ्यंकर यांनी भगवान परशुराम यांना माल्यार्पण केले.
यावेळी मधुकर जोशी, सुधीर चाटी व सुमित यावलकर यांच्या नेतृत्त्वात विष्णूसहस्त्र नाम पठन करण्यात आले. परशुराम चालीसाचे पठन शैलेश डेहाडराय यांच्या नेतृत्वात सामूहिक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव भुसारी यांनी केले. कार्यक्रमाला ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी, रामभाऊ वखरे, विनय शेणवाई, अनिरुद्ध जोशी, प्रकाश परसोडकर, भूषण अग्निहोत्री, सारंग आपटे, अभिषेक देशपांडे व समर्थ गो सेवा मंडळाचे सदस्य यांची उपस्थिती होती.