Todays horoscope
मेष,
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ,
आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन,
नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. संवादातून अनेक प्रश्न सुटतील. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
कर्क,
आज मनावर थोडा ताण राहू शकतो. शक्यतो वादाचे प्रसंग टाळा. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
सिंह,
अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. आत्मविश्वासात वाढ होईल.
कन्या,
नोकरीत पदोन्नती किंवा बदलीचे योग आहेत. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
तूळ,
आज नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. लांबच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळेल. मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक,
आरोग्याबाबत जागरुक राहा. वाहने जपून चालवा. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
धनु,
भागीदारीतील व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराकडून चांगली भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मकर,
प्रलंबित कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, तरीही यश तुमचेच असेल.
कुंभ,
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी दिवस सुखाचा जाईल. गुंतवणुकीतून फायदा होईल.
मीन,
मालमत्तेच्या कामात यश मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यानधारणा करा.