विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Mauli Service and Friendship Circle गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात कार्यरत नागपूर माऊली सेवा मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात कार्य करणारी ही संस्था होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित करत असते.

567 
 
 
अलीकडेच मगरडोह येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली. Mauli Service and Friendship Circle या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रुची वाढण्यास मदत होत आहे.माऊली सेवा मित्र मंडळामार्फत यापूर्वीही शालेय साहित्य, सायकली व पुस्तके वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कार्य स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पार पाडले जात असून, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे योगदान मोलाचे ठरत आहे.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र