सुरक्षा अभियान उत्साहात
नागपूर,
Nagpur Metro महा मेट्रोने प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्याने व्यापक सुरक्षा अभियान यशस्वीरीत्या राबविले. गत कोणतीही मोठी दुर्घटना न घडता उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था राखण्यात महा मेट्रोला यश मिळाले आहे. कर्मचार्यांच्या सतर्क, दक्ष व जबाबदार कार्यपद्धतीमुळे संभाव्य किरकोळ घटनाही टाळण्यात आल्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महा मेट्रो प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्यक्रम दिला आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंगणा डेपोच्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्स कार्यालयात सुरक्षा घेण्यात आला.
याप्रसंगी महाव्यवस्थापक (ऑपरेशन अँड मेन्टेनन्स )सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल) रितेश गर्ग, उपविभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रत्यक्ष व ऑनलाइन माध्यमातून १५० हून अधिक कर्मचारी सहभागी सहभागी झाले. या सत्रामध्ये सुरक्षेचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि सुरक्षित कार्यपद्धती यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सुरक्षा जनजागृती
Nagpur Metro मेट्रो ट्रेनमधील स्क्रीन, स्थानकांवरील डिस्प्ले, रस्त्यावरील मोठे फलक तसेच स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या रोल-अप स्टँडीद्वारे प्रवाशांमध्ये सुरक्षा जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने विविध स्थानकांवर मॉक ड्रिल्स करण्यात आले.
प्रात्यक्षिक सराव
एअरपोर्ट साऊथ, वासुदेव नगर स्थानकांवर २०० हून अधिक कर्मचार्यांच्या सहभागाने लिफ्ट रेस्क्यू, अग्निशमन आणि ट्रेन रेस्क्यू ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक सराव करण्यात आले. विशेषतः एअरपोर्ट साऊथ स्थानकावर ट्रेन रेस्क्यू मॉक ड्रिल यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक सक्षम झाली आहे.