वरूड,
murder-due-to-immoral-relationship : शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीतील करवार नाका ते पिपलागड रस्त्यावरील पुलाखाली शुक्रवार ३ एप्रिल रोजी किशोर प्रेमलाल युवनाते (३४ रा.खडकी ता.प्रभात पट्टन जि.बैतुल (म.प्र) या युवकाचे प्रेत व त्याची दुचाकी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. किशोरची पत्नी व त्याचा साळभाऊ यांच्या अनैतिक संबंधातून किशोरची हत्या झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी किशोरची पत्नी शिवकला युवनाते (२१, रा.खडकी ता.प्रभात पट्टन जि.बैतुल) व साळभाऊ मखन मनदेव धुर्वे (३२, रा. मेट ता.पांढुर्णा) यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

माहितीनुसार, रविवार १९ एप्रिल रोजी शें.घाट पोलिस किशोरच्या मृत्यू बाबत तपास करीत असताना त्याच्या नातेवाईकांनी किशोरच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला. मृतकाची पत्नी शिवकला युवनाते व मृतकचा साळभा उ मखन धुर्वे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा मृतकाची पत्नी शिवकला व मृतकचा साळभाऊ मखन यांचे पूर्वी पासून प्रेमसंबंध असल्याने मृतक हा शिवकलावर संशय घेत होता. त्यामुळे शिवकला व मखन या दोघांनी मिळून किशोरला संपविण्याचा कट रचला होता. गुरुवार २ एप्रिलला रात्री ९.३० वा सुमारास किशोर हा त्याच्या दुचाकीने आजीसासुच्या अत्यसंस्कारासाठी गेला होता. तेथून परत येत असताना करवार नाका ते पिपलागड रोडवरील घोगरा नाल्याच्या पुलाखाली मखनने त्याच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्या किशोरची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. त्यानंतर अपघाताचा बनाव करून पुरावे नष्ट केले. तांत्रिक तपासातून हा अपघात नसून खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट केले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधीकारी संतोष खांडेकर, स्था.गु.शाखेचे पो.नि किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात शे.घाटचे ठाणेदार दिपक महाडीक, पो.उप.नि मंगेश शेगोकार, संदीप वानखडे, विष्णु पवार, सागर लेव्हरकर, उमेश कुंभेकर, प्रियंका कुमरे यांनी केली.