पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी पाचपद्रा रिफायनरीला आग

उद्घाटनापूर्वीच आगीच्या ज्वाळांचा भडका, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
बालोत्रा,
Pachpadra refinery fire राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पाचपद्रा रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. मात्र, या सोहळ्याच्या 24 तास आधी त्या रिफायनरीला भीषण आग लागली. यात प्रकल्पाचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून हीव्हीआयपी सुरक्षा आणि तांत्रिक मानकांवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Pachpadra refinery fire  
सोमवारी दुपारी, रिफायनरी संकुलात उद्घाटनाची अंतिम तयारी सुरू असताना एका विशिष्ट युनिटमधून आगीच्या उंच ज्वाळा उठू लागल्या. धूर इतका दाटला की, तो कित्येक किलोमीटर दूरवरूनही दिसत होता. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांंच्या हस्ते होणार असल्यामुळे एसपीजी आणि राजस्थान पोलिसांनी नो-फ्लाय झोन आणि अभेद्य किल्ल्यात अचानक आग लागल्याने प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला.
आगीची माहिती मिळताच Pachpadra refinery fire  रिफायनरीची अत्याधुनिक अंतर्गत अग्निसुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. आग विझवण्यासाठी सध्या डझनभर अग्निशमन गाड्या आणि हायड्रंट सिस्टीम घटनास्थळी दाखल झाल्यात. एचपीसीएलच्या तांत्रिक तज्ञांचे एक पथक नुकसानीचे नियंत्रण करण्याच्या कामात गुंतले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी, रिफायनरीच्या संवेदनशील यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.
सुरक्षा आणि नियमावलीवर प्रश्नचिन्ह
पंतप्रधानांच्या दौèयाच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही केवळ एक तांत्रिक ठिणगी होती की सुरक्षेतील मोठी चूक?, अत्यंत संवेदनशील क्षेत्रात आग लागण्याचे नेमके कारण काय आहे?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.