उत्कृष्ट निवेदिका पल्लवी पुरोहित सत्कार

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
pallavi-purohit : सचिन डान्स अकॅडमी व लायन्स लब गांधी सिटी यांच्या संयुत वतीने आयोजित नृत्योत्सव-४ या सांस्कृतिक महोत्सवात उत्कृष्ट निवेदिका म्हणून येथील पल्लवी पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला. अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज, नागठाणा येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी नगराध्यक्ष मा. सुधीर पांगुळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
 
JKL
 
 
 
पल्लवी पुरोहित या हिंदी भाषिक असताना मराठीतून त्या सुंदर निवेदन करतात. आपल्या आवाजातील जादू, शब्दांतील प्रभाव आणि श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या त्या गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सूत्रसंचालन, प्रेरणादायी वक्तृत्व, रेडिओ जॉकी आणि व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करीत आहेत. २२ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासह त्यांनी १५०० हून अधिक कार्यक्रमांमध्ये आपल्या प्रभावी निवेदनाची ठसठशीत छाप उमटवली आहे. शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रांतील कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केले असून, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती व मारवाडी अशा अनेक भाषांमध्ये सहजतेने निवेदन करण्याची त्यांची विशेषता आहे.
 
 
श्रीमद्भागवत कथावाचन, कीर्तन सादरीकरण तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून त्यांनी सकारात्मक जीवनदृष्टी रुजवण्याचे कार्य केले आहे. साहित्यिक क्षेत्रातही कविता, कथा व ललित लेखनाद्वारे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
 
 
कार्यक्रमाला लायन्स लब गांधी सिटीचे पदाधिकारी आशिष पोहणे, अनिल नेरेडी, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, सचिन डंबारे, प्रमोद वाकडे तसेच नृत्योत्सवाचे स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे यांची विशेष उपस्थिती होती.