तत्कालीन आयुक्त आष्टीकर यांची चौकशी होणार

महापालिका आमसभेत झाला निर्णय

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
अमरावती,
praveen-ashtikar : महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी मनमर्जी कारभार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्याच्या या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत होती. आमसभेत त्यावर एकमताने निर्णय झाला असून निवृत्त न्यायाधीश व अभियंत्याची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. आष्टीकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 

l;
 
 
 
महानगरपालिकेची सर्वसाधारण आमसभा सोमवारी सभागृहात पार पडली. तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामांमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेता विलास इंगोले यांनी उपस्थित केला. आष्टीकर यांनी जवळपास सर्वच कामे नियमबाह्य पद्धतीने केली असून सुमारे १५० ते २०० कोटीचा घोळ त्यांनी घातला आहे. त्यांच्या कार्यळातल्या सर्व कामांची चौकशी होणे आवश्यक आहे. या मागणीला सभागृह नेता चेतन गांवडे, सदस्य मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल, प्रशांत देशपांडे यांच्यासह इतरांनी समर्थन दर्शविले. सभागृहाचे एकमत लक्षात घेऊन सभापती श्रीचंद तेजवानी यांनी आष्टीकर यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी निवृत न्यायाधीश व अभियंत्याचा समावेश असलेली समिती गठीत करण्याची घोषणा केली. या समितीने अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
शिक्षण विभागातील अधिकारी प्रवीण पाटील व नगरसेवक चंदू खेडकर यांच्यात झालेल्या वादाचे प्रकरण सभागृहात गाजले. खेडकर यांनी पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सदर प्ररणाच्या चौकशीचे आदेश सभापतींनी दिले. सदस्य प्रमोद महल्ले यांनी उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे शहरातल्या सर्व चौकातील वाहतूक दिव्यांजवळ सावलीसाठी ग्रीननेट बांधण्याची मागणी केली. सदर मागणी मंजूर झाली असून आठ दिवसात नेट लावण्यात येणार आहे.
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरातील साफसफाईचा कंत्राट असलेल्या कोणार्क कंपनीच्या कामाकाजाचे परिक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आमसभेत सादर करण्यात आला. या अहवालातल्या शिफारशी कंपनीला लागू केल्या जातात की नाही, हे पाहावे लागेल. शिफारशी लागू झाल्यातरच अहवालाला काही अर्थ आहे.