यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्या

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
भारतीय किसान संघाची मागणी

यवतमाळ, 
Provide crop insurance to farmers जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ प्रांत भारतीय किसान संघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन अपर जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. राज्यातील जवळपास अनेक जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून पीक नुकसानीचा विमा भरपाई जाहीर करण्यात आली. मात्र, आत्महत्याग्रस्त असलेल्या या यवतमाळ जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळख आहे. मात्र, या काही वर्षांत शेतकरी हा मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीवर अत्यंत गंभीर परिणाम होत आहे.
 
 
kishan
 
Provide crop insurance to farmers  शासनाकडून करण्यात आलेले धोरण हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चुकी आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. याचे मुख्य कारण काही दिवसात पेरणी, टोबणीचे दिवस जवळ येत आहेत. एकीकडे कर्ज कधी मिळणार याची काही शाश्वती नाही. या परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे, असे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट 35000 रुपये मिळवून देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा कंपनीकडून विमा मिळवून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भारतीय किसान संघाचे अनिल शेंडे, राम जिल्लडवार, बाबाराव कपिले, पंडित वारंगे, शुभांगी झिनपे, बाळाभाऊ राऊत हे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा
यावर तत्काळ तोडगा काढला नाही. तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.