अमरावतीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर छापा

-तिघांना घेतले ताब्यात -पुण्यात होता व्यवहार

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
raid-on-online-cricket-betting : शहर गुन्हे शाखेच्या पथाकाने सोमवारी आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळणार्‍यांवर छापा टाकला. चालक मालकासह तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल, लॅपटॉप, रजिस्टर व इतर जुगार साहीत्यासह ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन फे्रजरपुरा हद्दीतील ग्राम राजुरा येथील एका घरामध्ये महेश सुरेश पाटकर हा काही इसमांसह गुजरात टायटन्स विरूध्द मुबंई इंडियंन्स या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपव्दारे तसेच मोबाईल फोनच्या सहाय्याने अ‍ॅपमध्ये दाखवीत असलेल्या भावानुसार पैशांच्या हारजीतचा खेळ खेळवीत आहे. त्यानुसार पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एकूण ३ इसम हे मोबाईलव्दारे तसेच लॅपटॉपचा वापर करून क्रिकेट बेटिंग करताना आढळले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
 

lk 
 
 
 
त्यांचे लॅपटॉप तसेच मोबाईल तपासले असता सट्ट्याचे व्यवहार दिसून आले. काहींची फसवणूक केल्याचेही लक्षात आले. नमुद आरोपीने रितेश जोशी रा. यवतमाळ यांच्या नावाची आयडी स्वत:चे फायद्यासाठी वापरून लोकांची फसवणूक केल्याचे दिसून आल्याने व क्रिकेट सट्टयाची उतारी ही पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भ्ाुत उर्फ अग्रवाल याना देत असल्याचे तपासात पुढे आहे. नमुद सर्व आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन फे्रजरपुरा येथे प्रचलीत कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सरू आहे.
 
 
पोलिसांनी सध्या महेश सुरेश पाटकर (वय ३४ वर्ष, रा. अंबा कॉलनी शिव रेसीडेन्सी अमरावती), अभिजीत अरूण पेटकर (वय ३६ वर्ष, रा. आमनेर ता. वरूड , जि. अमरावती, सागर रामकृण निबंरते (वय ३० वर्ष, रा. सावता मैदान जुनीवस्ती बडनेरा, अमरावती) यांना अटक केली आहे. रितेश जोशी रा. यवतमाळ, गणेश उर्फ परेश मोहन भ्ाुत उर्फ अग्रवाल रा. पुणे यांचा पोलिस शोध घेत आहे. ९ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल कि.अ. ३ लाख ६० हजार, २ लॅपटॉप कि.अ. २ लाख व जुगार साहीत्य असा एकूण ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोउपनि गजानन सोनुने, पोलिस अंमलदार, दिपक सुंदरकर ,सुनील लासुरकर,जहीर शेख, सचीन बहाळे, नापोका अतुल संभे, सुरज चव्हाण, राजिक रायलीवाले, योगेश पवार यांनी केली.