शाळकरी मुले आणि पालकांचे समुपदेशन
नागपूर,
Railway security force campaign रेल्वे लाइन शेजारी राहणारे मुलं रेल्वे रुळावर मोठे दगड, लोखंड किंवा दुसर्या धोकादायक वस्तू ठेवतात. त्यातून रेल्वेचा भीषण अपघात होऊ शकतो, याची कल्पना नसल्यामुळे ही मुले हा गंभीर गुन्हा करतात. त्यांना परावृत्त करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागपूरसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करून शाळकरी मुले आणि पालकांचे समुपदेशन केले जात आहे.
Railway security force campaign रेल्वे रुळांवर लोखंड, लाकूड, दगड ठेवणे धावत्या गाड्यांवर दगडफेक करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी घडलेल्या अशा घटनांमध्ये ’बहुतेक वेळा रुळांजवळील शाळा, गाव किंवा वसाहतीतील मुले खेळाच्या किंवा उत्सुकतेपोटी हा गंभीर गुन्हा करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याबरोबरच रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.