मुंबई
Raja Shivaji movie 2026 रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. या चित्रपटासाठी बहुआयामी आणि दिग्गज कलाकारांची फळी एकत्र येत आहे. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर समोर येताच सोशल मिडीयावर तसेच मनोरंजन विश्वातून अनेकांच्या मनात या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालंय. अनेक कलाकार या चित्रपटाला शुभेच्छा देताना दिसतायत. दरम्यान, 'तान्हाजी: द अनसंग' या चित्रपटातून मराठ्यांची शौर्यगाथा समोर आणणाऱ्या बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यानेही 'राजा शिवाजी' चित्रपटाची झलक पाहून 'तान्ह्याचा मुजरा राजे' म्हणत रितेश आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. भारतीय इतिहासाचा गौरव, त्यातील भावगर्भता आणि भव्यता यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे.
अजय देवगण याने सोशल मिडीयावर राजा शिवाजी चित्रपटाचं फोटो शेअर करत या चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले," तान्ह्याचं नमन राजे, हे खूप अद्भूत दिसतंय" तुम्हाला फक्त यश आणि कीर्तीच लाभो, अशी शुभेच्छा!" असं म्हणत अजय देवगणने राजा शिवाजी चित्रपटाच्या टीमला आणि रितेश देशमुखला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.