गजानन उदार व पांडुरंग साखरकर यांचा सन्मान
भावनिक वातावरणात निरोप
घाटंजी,
Retirement of soldiers पोलिस ठाण्यात गृहरक्षक दलातील दोन जवानांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रम गुरुवार, 16 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. या सोहळ्याला जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त गृहरक्षक गजानन उदार व पांडुरंग साखरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने कर्तव्य बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
Retirement of soldiers पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपल्या मनोगतात गृहरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक करत, आपत्कालीन परिस्थितीत गृहरक्षक दल हे पोलिस दलाचे सक्षम बळ ठरते, असे प्रतिपादन केले. यावेळी सेवानिवृत्त गृहरक्षकांनी सांगितले की, पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सेवानिवृत्ती सोहळा पार पडणे ही आमच्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. कार्यक्रमाला सहायक पोलिस निरीक्षक सचिन राठोड, उपनिरीक्षक विनाश जाधव, उपनिरीक्षक अशोक मडावी, पांढरकवडा गृहरक्षक पथकप्रमुख अन्सार खान प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अमोल कोवे, दिनेश जाधव, मेघाली खुपसे, देवानंद जाधव, आकाश ठाकरे, रामदास माटे यांच्यासह पोलिस व गृहरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सेवानिवृत्त गृहरक्षकांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव मांडत सर्वांचे आभार मानले. सोहळा भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.