तुझी शारीरिक गरज असेल तर...

"नाशिक फाईल्स" महिलेच्या तक्रारीतून धक्कादायक प्रकार उघड

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नाशिक,
shocking nature of the 'Nashik Files' सध्या देशभरात गाजत असलेल्या 'नाशिक फाईल्स'चा गंभीर प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या महिलेने नोंदवलेल्या तक्रारीतून धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. संबंधित प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या वर्षापासून कंपनीत नोकरी करत होती आणि वैयक्तिक कारणांमुळे ती नाशिकमध्ये एकटी राहत होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही सहकाऱ्यांनी तिच्याशी अयोग्य वर्तन करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला ओळखीच्या निमित्ताने संवाद साधणाऱ्या व्यक्तींनी हळूहळू मर्यादा ओलांडत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अयोग्य प्रश्न विचारले, तसेच मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढले.
 

Nashik Files 
महिलेच्या म्हणण्यानुसार, काही जणांनी तिला अनुचित प्रस्ताव देत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशिक्षणाच्या काळातही एका सहकाऱ्याकडून गैरवर्तन झाल्याचे तिने नमूद केले आहे. वरिष्ठांकडूनही मदतीऐवजी दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे तिची मानसिक अवस्था अधिकच खालावली. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित संस्थेतील वातावरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपींचा नेमका हेतू आणि या प्रकरणामागील सर्व बाजू उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.