आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची मागणी
यवतमाळ,
Soybean insurance जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकèयांना तातडीने हेक्टरी 25,000 रुपये विमा परतावा देण्यात यावा, अशी मागणी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पत्रपरिषदेतून केली. पुढे बोलताना आ. मांगुळकर म्हणाले, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत अनुक्रमे 21, 19 आणि 26 दिवस पाऊस झाल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. दाणा भरण्याच्या टप्प्यावर सतत पाऊस झाल्यामुळे दाणे बारीक राहिले आणि अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये तब्बल 2,64,449 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. शेतकरी हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा ठेवतात; मात्र कृषी विभागाने केवळ 8.75 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादकता नोंदवली असून ती गंभीर नापिकी दर्शवते. 2024 च्या पीक विमा योजनेत प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झाल्यास 72 तासांत तक्रार नोंदवून शेतकèयांना विमा मिळत होता. मात्र, सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (शासन निर्णय 24 जून 2025) ही अट रद्द करण्यात आली असून ही योजना शेतकरीविरोधी ठरत आहे.
Soybean insurance सद्यस्थितीत पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा पद्धतीमुळे शेतकèयांना अत्यल्प किंवा अजिबात लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मागील सात वर्षांतील सर्वोत्तम पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनावर 70 टक्के जोखीम स्तर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकèयांना 30 टक्के नुकसान स्वतः सहन करावे लागत असून, 70 टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाल्यासच विमा मिळतो. तसेच, पीक कापणी प्रयोगासाठी केवळ 10ु.5 मीटर (0.005 हेक्टर) क्षेत्र विचारात घेतले जाते. यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळांमध्ये एकूण पीक कापणी प्रयोग क्षेत्र फक्त 0.55 हेक्टर आहे, जे प्रत्यक्ष 2,64,449 हेक्टर पेरणीच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Soybean insurance जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 58,000 रुपये प्रती हेक्टर असताना, नुकसानभरपाई अपुरी मिळत असल्याने शेतकèयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकèयांना दिलासा देण्यासाठी तातडीने प्रती हेक्टर 25,000 रुपये विमा परतावा जाहीर करावी, अशी मागणी आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी केली. या पत्रपरिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, राजीव गांधी पंचायतराजचे मनोज पाचघरे, शेतकरी संघटनेचे विजय निवल व मिलिंद दामले तसेच काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते.