४ वर्षीय चिमुकल्यावर मोकाट श्वानांचा हल्ला

*सेवाग्राम येथील रुगणालयात उपचार सुरू

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
सेलू, 
stray-dogs-attack-toddler : शहरासह परिसरात मोकाट श्वानांचा वाढता सुळसुळाट चिंतेचा विषय ठरत असतानाच सोनियानगर (घोराड) येथे चार वर्षीय बालकावर पिसाळलेल्या मोकाट श्वानाने हल्ला केला. यात बालक गंभीर जखमी झाला असून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दीपांशू महेश गुरुपंच रा. सोनियानगर, घोराड असे जखमीचे नाव आहे.
 
 
AQAA
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दीपांशू हा घराजवळ खेळत असताना अचानक एका मोकाट श्वानाने त्याच्यावर हल्ला केला. श्वानाने दीपांशूच्या चेहर्‍यावर व शरीराच्या विविध भागांवर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. रतबंबाळ अवस्थेत चिमुकल्याचा आक्रोश ऐकून नागरिकांनी धाव घेत त्याची सुटका केली. घटनेनंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावर खोल जखमा असून डॉटरांकडून उपचार सुरू आहेत. दरम्यान, घोराड व परिसरात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने पालकांमध्ये संताप व्यत होत आहे.
 
 
घोराड गावात मोकाट श्वानांची मोठ्या प्रमाणात संख्या असून रात्रीच्या वेळी फिरणे कठीण झाले आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. आता एका निष्पाप बालकाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यत केली.