शाळेची तयारी करताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

*देलनवाडी येथील घटना

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
ब्रम्हपुरी,
student-dies-of-heart-attack : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील देलनवाडी येथे घडली. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी ईशान सत्यपाल आत्राम असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
 
jk
 
 
ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच, सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवार, 21 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ईशानच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मोठा आप्त परिवार आहे.