दशावतार गायिका स्वानंदी सरदेसाई विवाहबंधनात

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मुंबई
Swandani Sardesai marriage कोकणातील सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेली आणि ‘दशावतार’ चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत आलेली गायिका स्वानंदी सरदेसाई हिने 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाह केला आहे. स्वानंदीने आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी ही आनंदवार्ता शेअर केली असून तिच्या लग्नाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 

Swandani Sardesai marriage 
कोकणात वास्तव्यास असलेल्या स्वानंदीने आपल्या दैनंदिन जीवनाचे, गावातील संस्कृतीचे आणि पारंपरिक जीवनशैलीचे व्हिडिओ सोशल मीडियावरून सादर करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर तिच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाल्यानंतर ती एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाऊ लागली.सोशल मीडियावरील या लोकप्रियतेमुळेच तिला ‘दशावतार’ या चित्रपटात गाण्याची संधी मिळाल्याचे स्वानंदीने पूर्वी एका व्हिडिओत सांगितले होते. या संधीमागे तिच्या चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा मोठा वाटा असल्याचे तिने स्पष्ट केले होते. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर विविध गाणी पोस्ट केल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादामुळेच तिचा प्रवास पुढे गेला, असेही तिने नमूद केले होते.
विवाहानंतर स्वानंदीच्या Swandani Sardesai marriage चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्या पुढील संगीत प्रवासाबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेला तिचा प्रवास आता वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यावर पोहोचला असून तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.