उद्यापासून शिक्षक-कर्मचारी संपावर

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वर्धा,
teachers-employees-on-strike : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचे शस्त्र उपसले आहे.
 

K 
 
 
राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी/समन्वय समितीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केले जात असून यात राज्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मराठवाडा शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन याही संघटना सहभागी झाल्या आहेत. सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या सतीची अट रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करणे, संचमान्यता २०२५-२६ नुसार अतिरित ठरलेले शिक्षक, शून्य शिक्षकी झालेल्या शाळा, विद्यार्थी याबाबत शासनाचे स्वयंस्पष्ट धोरण, १०-२०-३० ची सेवांतर्गत प्रगती योजना शिक्षकांना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष असणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.