हळद उत्पादक शेतकऱ्यांशी मुक्त संवाद
पुसद,
औषधी गुणधर्मामुळे हळद पिकाला मोठी मागणी आहे. हळद पिकांसह गरगल, मिरची, तीळ, करोळ, जिरे, राई या मसाले पिकांचे चांगले उत्पादन येऊ शकते. परंपरागत शेतीपेक्षा मसाले पीक विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. मुख्यत्वे हळद पीक मोठ्या प्रमाणावर घेऊन थोड्या क्षेत्रावर इतर मसाले पिके घ्यावीत, असा मौलिक सल्ला अमरावती येथील सुप्रसिद्ध घरकुल मसाले ब्रँडचे उद्योजक तुषार वरणगावकर यांनी दिला. पुसदचे उपविभागीय महसूल अधिकारी आशिष बिजवल यांच्या पुढाकारातून पुसद, महागाव तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची एक बैठक पार पडली. यावेळी शेतकèयांशी संवाद साधताना Tushar Varangaonkar वरणगावकर यांनी हळद पिकाची लागवड, उत्पादन व विक्री या संदर्भात मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल अध्यक्षस्थानी होते. उपविभागीय कृषी अधिकारी विजय मुकाडे, वसंत बायोटेकचे हळद तज्ञ प्रा. गोविंद फुके, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सोनी, पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने, प्रगतिशील शेतकरी ओमप्रकाश शिंदे, अभय कदम, शिवराम शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. वरणगावकर यांनी घरकुल तर्फे शेतकèयांना हळदीला योग्य भाव कसा मिळेल, या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. शेतकरी हळदीचे वाण साधारणत: सेलम जातीचे वापरतात. यात करक्युमिनचे प्रमाण वायगावपेक्षा अधिक आढळते.
Tushar Varangaonkar अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील हळदीमध्ये हे प्रमाण जास्तीत जास्त 5 टक्के परीक्षणात आढळून आले आहे. मेघालयात हळद पिकवली जाते, परंतु हवामान आणि जमिनीचा पोत यामुळे हे प्रमाण 9 टक्क्यांपर्यंत पहावयास मिळते. मसाल्यासाठी ही हळद लांबून खरेदी करावी लागते. मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांनाही उच्च दर्जाची हळद पिकविणे शक्य आहे. कमी खर्चातील, मोजक्या व्यवस्थापनातून हळद पिकातून चांगला नफा मिळू शकतो. यंदा मागील वर्षीची साठवणूक केलेली हळद कमी असून नवीन हळदीला बाजारपेठेत मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे सध्या 14-15 हजार प्रती क्विंटल एवढे भाव असले तरी पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अंदाज घेऊन त्यांच्याकडे साठवणूक क्षमता आहे, असे शेतकरी या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात. घरकुलतर्फे विनाअडत व विनामध्यस्थ बाजारदराने थेट हळदीची खरेदी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच वाहन भाडेसुद्धा देण्याचा त्यांनी संकल्प केला. याद्वारे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हळद प्रक्रियेत बदल करा
केवळ महाराष्ट्रातच पिकवलेली हळद शिजवण्यात येते व नंतर वाळवून हळकुंड विक्री केल्या जाते. ही पद्धत खर्चिक आहे. त्याऐवजी ओल्या हळदीला स्वच्छ धुवून तिचे चिप्स तयार करावेत व चार दिवस वाळविल्यानंतर या हळदीची थेट खरेदी करण्यात येईल, असे तुषार वरणगावकर यांनी सांगितले. या पद्धतीत कर्क्युमिनचे प्रमाण जास्त राहत असल्याने तसेच वजनातील घट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. हळद चिप्स बनवण्यासाठी यंत्र उपलब्ध असून ते निःशुल्क पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.